इयत्ता 8वी मराठी नमूना प्रश्नपत्रिका (SA-1)
इयत्ता -8वी संकलित मूल्यमापन-1
वर्ष: 2025-26
प्रश्न 1: योग्य पर्याय निवडा. (3 गुण)
1. या कवितेत कोणत्या पक्षाचे वर्णन केले आहे?
- अ) बदक
- ब) पोपट
- क) राजहंस
- ड) कावळा
2. शिवांगीला काय व्हायचं आहे?
- अ) पोलीस
- ब) वकील
- क) गुन्हेगार
- ड) डॉक्टर
3. बैलपोळा या सणाला बैलांना सन्मानाने आमंत्रण देऊन त्यांचे कोड कौतुक करण्याचा दिवस कोणता?
- अ) दिवाळी
- ब) दसरा
- क) नागपंचमी
- ड) पोळा
प्रश्न 2: रिकाम्या जागा भरा. (3 गुण)
1. ............................................हवे मज माणूस वदला.
2. -------- चालता जनू लई भागला.
3. आमच्या वस्तीत एक जुनी........................ होती.
प्रश्न 3: जोड्या जुळवा. (4 गुण)
अ गट | ब गट |
---|---|
1. चांदण्याला | अ. कुह कुह |
2. कोकिळा | ब. तरवडीच्या शेंगा |
3. शुक | क. जाग |
4. खुळखुळे | ड. संपूर्ण वैराग्य असलेला वेदकालीन ऋषी |
प्रश्न 4: खालील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. (10 गुण)
1. लोक हसून काय म्हणत असत?
2. गौरी व शिवांगीचे मुंबई दर्शन अर्धवट का राहिले?
3. गोकुळ बेचैन का झाले आहे?
4. लेखिकेला रात्री झोप केव्हा येत होती?
5. चिंगीला कसा नवरा मिळणार आहे?
प्रश्न 5: खालील प्रश्नांची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. (12 गुण)
1. सुट्टीची आठवण आल्यानंतर लेखिकेला कोणकोणत्या गोष्टी आठवत होत्या?
2. शिक्षणासाठी बाहेर जाताना कलामांना वडिलांनी काय सांगितले?
3. लेखकांनी कोणती निसर्ग शोभा पाहिली?
प्रश्न 6: व्याकरण (8 गुण)
1. समानार्थी शब्द लिहा : (2 गुण)
- अ) मंगल
- ब) अकृत्रिम
2. विरुद्धार्थी शब्द लिहा : (2 गुण)
- अ) सुख
- ब) प्रेम
3. अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : (2 गुण) पाहुणचार करणे
4. “बरं काकू! तुम्ही शाहाळपाणी घ्या, मग आपण जाऊ”शिवांगी म्हणाली. या ओळीत कोणकोणती विरामचिन्हे वापरण्यात आली आहेत? (2 गुण)
आदर्श उत्तर सूची
- प्रश्न 1: बहुपर्यायी प्रश्न
- क) राजहंस
- क) गुन्हेगार
- ड) पोळा
- प्रश्न 2: रिकाम्या जागा भरा
- शक्ती
- वाटुळ
- मशीद
- प्रश्न 3: जोड्या जुळवा अ गट
- चांदण्याला
- कोकिळा
- शुक
- खुळखुळे
ब गट- क. जाग
- अ. कुह कुह
- ड. संपूर्ण वैराग्य असलेला वेदकालीन ऋषी
- ब. तऱवडीच्या शेंगा
- प्रश्न 4: खालील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा
- वेगळेच एकटेच तरंगत असलेल्या त्या पिल्लाकडे पाहून हसत असत. ते त्याला हे बदकाचे पिल्लू वेडपट आणि विरूप आहे. ते इतरांपेक्षा वेगळेच वाटते. वेगळेच एकटेच तरंगत असते असे म्हणत.
- गौरीच्या आईच्या बांगड्या चोरीला गेल्या. यामुळे मुंबई दर्शन अर्धवट राहिले.
- पहाटेचा शुक्रतारा मावळत चालला होता आणि वाराही सावकाश वाहत होता अशा वेळेला श्रीकृष्ण अजून झोपेमध्ये अनेक स्वप्नाच्या मालिकेत रमला होता. त्याला जाग येत नव्हती. म्हणून गोकुळात राहणाऱ्यांनी मुकुंदाचे नाव घेऊन लवकर उठ असे म्हणून मोठ्यानी हाका मारल्या.
- लेखिकेच्या अंगावरून रात्री आईचे मऊगार हात फिरायला लागले की झोप येत होती.
- चिंगी काळी नाही गोरी गोरी पान आहे. म्हणून तिला नवरत्नासारखा अगदी चित्रातल्यासारखा नवरा मिळणार आहे.
- प्रश्न 5: खालील प्रश्नांची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा
- लेखिकेला सुट्टीची आठवण आल्यानंतर आपल्या अंगानातील हजारी मोगऱ्याचे झाड, शनिवारवाड्यात सकाळ सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेले पाणी, आई आल्याची कुरड्या-पापडांची घाई, अंगणभर पडणारी वाळवण, कैरीची डाळ आणि पन्हं, चोखायला मिळणारा बर्फाचा गोळा, उसाचा ताजा रस, पुस्तके वाचण्याची आठवण व पुस्तकातील गमती जमती अशा अनेक गोष्टी लेखिकेला आठवत होत्या.
- शिक्षणासाठी बाहेर जाताना कलामांना वडिलांनी सांगितले की, या गावात तुझे शरीर राहत होते. आत्मा नाही. तुझ्या आत्म्याचा निवास उज्वल भविष्याच्या पोटी आहे. आम्ही कुणी तिथवर पोचू शकणार नाही. आमची स्वप्नेसुद्धा तिथवर जाऊ शकणार नाहीत. अल्लाची तुझ्यावर सदैव कृपा राहू दे.'
- वाट चुकल्यामुळे लेखकाला महाबळेश्वरच्या डोंगराचे कधी न पाहिलेले भाग पाहिले. एका नदीच्या टोकावरील कड्यावर तो बसला होता. आकाशात प्रचंड ढग काळे विमानाप्रमाणे तरंगत होते. तोच वाऱ्याचे झोत उठले व पाऊस सुरू झाला. शत्रूसारखे अचानक छापा घालून पुढे निघून जाणाऱ्या सैन्याप्रमाणे गायब झाले. पुन्हा आकाशात प्रचंड कमान आपल्याकडे सरकत येत आहे अशी निसर्गशोभा लेखकाने पाहिली.
- प्रश्न 6: व्याकरण
- समानार्थी शब्द लिहा : (2 गुण)
अ) मंगल = शुभ ब) अकृत्रिम = नैसर्गिक - विरुद्धार्थी शब्द लिहा : (2 गुण)
अ) सुख x दुःख ब) प्रेम x द्वेष - अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : (2 गुण)
पाहुणचार करणे: अतिथिचा आदर सत्कार करणे. वाक्य: घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. - विरामचिन्हे ओळखा : (2 गुण)
“बरं काकू! तुम्ही शाहाळपाणी घ्या, मग आपण जाऊ”शिवांगी म्हणाली. या ओळीत कोणकोणती विरामचिन्हे वापरण्यात आली आहेत?उत्तर: दुहेरी अवतरण चिन्ह (“….”), उद्गारवाचक चिन्ह (!), स्वल्पविराम (,), पूर्णविराम (.)
- समानार्थी शब्द लिहा : (2 गुण)
उत्तरसूची (Answer Key)
- प्रश्न 1: 1 - क) राजहंस ; 2 - क) गुन्हेगार ; 3 - ड) पोळा
- प्रश्न 2: 1 - शक्ती ; 2 - वाटुळ ; 3 - मशीद
- प्रश्न 3: चांदण्याला — क. जाग ; कोकिळा — अ. कुह कुह ; शुक — ड. संपूर्ण वैराग्य असलेला वेदकालीन ऋषी ; खुळखुळे — ब. तऱवडीच्या शेंगा
- प्रश्न 4: (सदर उत्तरे प्रश्नात दिलेल्या वर्णनानुसार आहेत)
- प्रश्न 5: (सदर उत्तरे प्रश्नात दिलेल्या वर्णनानुसार आहेत)
- प्रश्न 6:
- समानार्थी: अ) मंगल = शुभ ; ब) अकृत्रिम = नैसर्गिक
- विरुद्धार्थी: अ) सुख x दुःख ; ब) प्रेम x द्वेष
- पाहुणचार करणे: अतिथिचा आदर सत्कार करणे. वाक्य: घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे.
- विरामचिन्हे: दुहेरी अवतरण चिन्ह (“….”), उद्गारवाचक चिन्ह (!), स्वल्पविराम (,), पूर्णविराम (.)
नमूना प्रश्नपत्रिका PDF डाऊनलोड करा.
टिप्पणी पोस्ट करा